Share

साखर कारखानदारीत परिवर्तन केले, आता राजकीय परिवर्तन करणार- सतीश घाटगे

सतीश घाटगे यांच्या ‘व्हिजन’ने शेतकरी प्रभावित

घनसावंगी :  Ghansavangi Vidhansabha : समृद्धी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यास शेतकऱ्यांचा उस बांधावर पडू नये,  त्यांच्या उसाला न्याय आणि चांगला भाव  मिळावा, म्हणून समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी शेतकऱ्यांसाठी समृद्धी कारखान्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.  मंगळवारी (ता. २२) समृद्धीच्या  १० हजार मे. टन गाळप  क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा हजारो  ऊस उत्पादक  शेतकरी व कामगार यांच्या हस्ते मोठ्या भूमिजन सोहळा उत्साहात पार पडला.

याप्रसंगी सतीश घाटगे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार पुन्हा एकदा जनतेसमोर जाहीर केला. ज्या पद्धतीने साखर कारखानदारीत ‘समृद्धी’ने परिवर्तन केले, उस उत्पादक शेतकऱ्यांना भयमुक्त केले. त्याच पद्धतीने  जनतेच्या साथीने आगामी विधानसभा निवडणूक घन सावंगीत राजकीय परिवर्तन करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंबड – घनसावंगी तालुक्यात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या काळात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शेतकऱ्यांना भयमुक्त होऊन उसाची लागवड करता यावी म्हणून समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी  शेतकऱ्यांसाठी समृद्धी कारखान्याचा  विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, उसतोड कामगार व उसतोड यंत्रणेतील कामगारांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.

विस्तारीकरणानंतर समृद्धीची  प्रती दिन गाळप क्षमता १० हजार मे. टन आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर-२०२५ पर्यंत उभा करण्याचा प्रयत्न समृद्धी कारखाना करणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास विजय कामड, गौतम गोलेच्छा, शिवाजीराव बोबडे, बालाजी खोजे, भगवान बर्वे, बाळासाहेब बोरकर, पांडुरंग भांगे, अरुण घुगे, शिवाजीराव कटारे , शिवाजीराव कंटूले, शिवाजी नाना मोरे, राहुल कणके,  नामदेव ढाकणे, पांडुरंग खटके, रामेश्वर माने, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे सर्व विभागाचे अधिकारी, भाजपचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

२५ वर्षात जे झाल नाही, ते ५ वर्षात करून दाखवणार

प्रस्थापित आमदारांनी २५ वर्षात जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं शासनाच्या जनकल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही म्हणून घनसावंगी येथील प्रत्येक घटकातील जनतेच्या विकासासाठी जे २५ वर्षात झालं नाही ते पाच वर्षांमध्ये करून दाखवीन, असा शब्द सतीश घाडगे Satish Ghadage Patil यांनी उपस्थित शेतकरी वर्गांना दिला. हा शब्द देताना त्यांनी सांगितलं की मी जे बोलतो ते करतो बारामती करायची जबाबदारी आता मी पूर्ण करून दाखवतो अशा शब्दात त्यांनी आमदार राजेश टोपे यांच्यावर टीका देखील केली.

 

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी गोदावरी-दुधनेचा संगम

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी गोदावरी आणि दुधना नदीचा संगम करणार घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जालना त आणि घनसावंगी तालुक्यातील दुष्काळी गावांना कायमचे दुष्काळमुक्त करायचं असल्यास गोदावरीचे पाणी तुटणार आणावच लागेल हे पाणी कसं येणार याची चित्रफित या सोहळ्यात शेतकरी वर्गाला दाखवण्यात आली हे चित्रफित प्रस्तावित गुंज उपसा जलसिंचन योजना वर आधारित होती या चित्रफितीमुळे उपस्थित शेतकरी प्रभावित झाले.

 

सतीश घाटगे यांच्या ‘व्हिजन’ने शेतकरी प्रभावित

या भूमिपूजन सोहळ्यात सतीश घाटगे यांनी येणाऱ्या काळात शेतकरी, युवक, महिला अशा सर्व घटकासाठी असलेले विकासाचे व्हिजन मांडले. हे व्हिजन पाहून आणि ऐकून सर्व शेतकरी प्रभावित झाले. दुष्काळी गावांसाठी पाणीदार करणाऱ्या त्यांच्या व्हिजनची जालना आणि घनसावंगी तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे.

ना मोठा राजकीय नेता.. ना प्रसिद्ध सेलेब्रीटी 
समृद्धीच्या भूमिपूजन सोहळ्यात शेतकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी
घाटगे पाटलांचा मास्टर स्ट्रोक… भूमिपूजन सोहळ्यातून वातावरण केले टाईट 
अजूनही हा फक्त ट्रेलर आहे… वादळ येणे अजून बाकी आहे- सतीश घाटगे

News

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या