Category: Politics

  • पदवीधर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी १८ वर्षे पाठपुरावा; सतीश चव्हाण यांच्या शैक्षणिक कामांचा आढावा

    पदवीधर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी १८ वर्षे पाठपुरावा; सतीश चव्हाण यांच्या शैक्षणिक कामांचा आढावा

    पदवी प्रमाणपत्र शुल्कमाफीपासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपर्यंत, वयोमर्यादा वाढीपासून परीक्षा शुल्कमाफीपर्यंत विविध प्रश्नांवर शासनदरबारी पाठपुरावा

    छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना पदवीधर, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर शासनदरबारी पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सादर केलेल्या कामांच्या तपशिलातून करण्यात आला आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारा दंड माफ करणे, स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढविणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देणे, परीक्षा शुल्कमाफी आणि शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदांचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांचा या कामांमध्ये समावेश आहे. चव्हाण यांच्या कार्यअहवालानुसार, पदवीधर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधान परिषदेत आवाज उठवण्यासह संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला.

    पदवी प्रमाणपत्रासाठीचा दंड माफ

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवी प्रमाणपत्र मिळवताना विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दंड भरावा लागत होता. मराठवाड्यात २०१९ मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना हा दंड माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे कार्यअहवालात नमूद आहे.

    स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढविण्यासाठी पाठपुरावा

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील तसेच मागासवर्गीय उमेदवारांची कमाल वयोमर्यादा वाढविण्याची मागणी त्यांनी केली होती. यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर २५ एप्रिल २०१६ रोजी खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय झाल्याचे कार्यअहवालात नमूद करण्यात आले आहे.

    महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी आग्रही भूमिका

    राज्य शासनाच्या विविध पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमधील गैरप्रकारांबाबत प्रश्न उपस्थित करत हे पोर्टल बंद करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती. या मागणीसाठी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधल्याचा उल्लेख कार्यअहवालात आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२० रोजी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय झाल्याचे त्यात नमूद आहे.

    पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढ

    पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी त्यांनी विधान परिषदेत केली होती. कार्यअहवालानुसार, या मागणीनंतर खुल्या प्रवर्गासाठी ३१ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३४ वर्षे वयोमर्यादा ग्राह्य धरण्याची घोषणा तत्कालीन महसूल मंत्र्यांनी केली होती.

    शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्नमर्यादेत वाढ

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ मिळवताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पालकांच्या उत्पन्नमर्यादेमुळे अडचणी येत होत्या. ही मर्यादा वाढविण्याची मागणी चव्हाण यांनी शासनाकडे केली होती. कार्यअहवालानुसार, ३१ मार्च २०२१ रोजी झालेल्या शासननिर्णयानुसार उत्पन्नमर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्यात आली.

    आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांना मदतीचा प्रयत्न

    मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाचा दौरा करताना आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख कार्यअहवालात आहे. अशा विद्यार्थ्यांना मदत करणे ही केवळ लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी नसून कर्तव्य असल्याची भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचे प्रयत्न केल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे.

    काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरी

    मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचाही उल्लेख कार्यअहवालात आहे. २६ जुलै २०१८ रोजी काणडगाव येथे शिंदे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काकासाहेब यांचे बंधू अविनाश शिंदे यांना शैक्षणिक पात्रतेनुसार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत कायमस्वरूपी लिपिक पदाची नोकरी मिळवून दिल्याचे त्यात नमूद आहे.

    कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत

    कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी अडकले होते. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्याची मागणी १८ एप्रिल २०२० रोजी करण्यात आल्याचा उल्लेख कार्यअहवालात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर राज्यातून १०० बस रवाना करण्यात आल्याचे आणि विद्यार्थ्यांना घरी परतण्यास मदत झाल्याचे त्यात नमूद आहे.

    सेट परीक्षेची तारीख जाहीर करण्यासाठी पाठपुरावा

    सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्य पात्रता परीक्षेची (SET) तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. यासंदर्भात चव्हाण यांनी १२ मे २०२६ रोजी मंत्र्यांची भेट घेऊन परीक्षा तारखेची अधिकृत घोषणा करण्याची मागणी केल्याचे कार्यअहवालात नमूद आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याचे त्यात म्हटले आहे.

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्कमाफी

    मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी ११ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे कार्यअहवालात नमूद आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासननिर्णय काढून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय झाल्याचे त्यात म्हटले आहे.

    सारथी वसतिगृहासाठी पाठपुरावा

    छत्रपती संभाजीनगर येथे सारथी संस्थेचे वसतिगृह सुरू करण्यासाठी १३ सप्टेंबर २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी करण्यात आल्याचे कार्यअहवालात नमूद आहे. या मागणीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. पुढे वसतिगृहाच्या कामाला सुरुवात झाल्याचा आणि ४ मे २०२५ रोजी कामाची पाहणी केल्याचा उल्लेखही त्यात आहे.

    टीईटी पेपरफुटी प्रकरणात कारवाईची मागणी

    २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर एक दिवस आधी फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी २७ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे कार्यअहवालात नमूद आहे.

    कृषी विद्यापीठांतील रिक्त पदांचा प्रश्न

    राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत चव्हाण यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतल्याचे कार्यअहवालात म्हटले आहे. एकूण ११,४०० पदांच्या सुधारित आकृतिबंधाला मान्यता देऊन भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.

    विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीचा प्रश्न

    महात्मा ज्योतिबा फुले संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी ३० ऑगस्ट २०२२ रोजी तत्कालीन मंत्री अतुल सावे यांच्याकडे केल्याचे कार्यअहवालात नमूद आहे.

  • संभाजीनगरात गुलाल उधळणे, हीच  संभाजी महाराजांना श्रध्दाजंली

    संभाजीनगरात गुलाल उधळणे, हीच संभाजी महाराजांना श्रध्दाजंली

    संभाजीनगर : टीम सत्ताकारण

    ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. त्याच्या कबरीवर फुले उधळण्यास काही लोक जातात. संभाजीनगरच्या नावाला विरोध करणारे लोक आपल्याला चालणार नाहीत. त्यामुळे ४ तारखेला याठिकाणी महायुतीच्या विजयाचा गुलाल उधळणे, हीच खरी छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.

     

    छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.७) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, काल ओवेसी यांनी येथे येऊन काही नारे दिले. राम मंदिरला विरोध केला. राम नवमीला येथे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांमध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांनी संभाजीनगरवर जीवापाड प्रेम केले. त्यामुळे येथील मतदार शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. गेल्यावेळी गडबड झाली पण यावेळी आपल्या हक्काचा धनुष्यबाण निवडून द्यायचा आहे. तो धनुष्यबाण संदीपान भुमरे यांच्या हातात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

     

    अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधले. ३७० कलम हटवले. त्यालाही विरोध करण्यात आला. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे नकली हिंदुत्ववादी राम मंदिराच्या उद्धाटनाला गेले नाहीत. हेच का तुमचे राम प्रेम, का असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.

     

    ज्यांनी धर्मवीरांचा अतोनात छळ केला, त्यांच्या नांग्या ठेचून त्यांना त्यांची जागा दाखवा. आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. ज्यांनी मुंबईसाठी, राज्यासाठी बलिदान दिले, त्या शहिदांचा अपमान काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही मतदान करणार का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

     

    जे मुसलमान देशभक्त, राष्ट्रभक्त आहेत. अब्दुल कलाम आझाद राष्ट्रपती होते. बाळासाहेबांच्या काळात साबीर शेख मंत्री होते. हे देशभक्त मुसलमान आपले आहेत. पण इथे राहून पाकिस्तानची बोली बोलणारे मुसलमान आपले दुश्मन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उबाठाच्या काळात याकूब मेमनची कबर सजवण्याचे काम केले होते. आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटत असल्याची टीका मुख्यमंत्री केली.

  • कडुच्या हो, जातीवाद करु नका रे… मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी?

    कडुच्या हो, जातीवाद करु नका रे… मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी?

    परभणी : टीम सत्ताकारण

    मी, मतदार संघातुन बोलतोय, मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता येईल का? अशी विचारणा करण्यासोबतच ओबीसीमधुन आरक्षण कशाला घेता, असे म्हणणार्या एकाला वसमतचे आमदार राजु नवघरे यांनी चांगलेच फैलावर घेतले.

    कडुच्या हो, जातीवाद करु नका रे.. मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी करता, असे विचारत त्याच्यावर आमदार नवघरे चांगलेच खवळले.

    मराठा आरक्षणाचा लढा सुरु झाल्यापासुन ओबीसी प्रवर्गातुन समाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजु नवघरे यांना एकाने कॉल करुन मी आपल्या मतदार संघातुन बोलत असल्याचे सांगीतले.

    मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता का? ओबीसीमधुन आरक्षण कशाला घेता, असे अनेक प्रश्न विचारले. त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात येताच आमदार नवघरे संतापले. तुला भेटायला येतो, तुला मदत करतो, असे म्हणत त्याला फैलावर घेतले.

    तसेच कडुच्या हो, मराठा समाजाचा तिरस्कार करु नका रे, असे खडे बोल असे सुणावले. या संवादाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • “छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रीमंडळातुन काढा”

    “छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रीमंडळातुन काढा”

    मुंबई : टीम सत्ताकारण

    Maratha Reservation  | मराठा आरक्षणाबाबत सातत्याने विरोधात बोलणार्या छगण भुजबळांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मंत्री भुजबळ यांना कमरेत लाथ घालुन मंत्रीमंडळातुन बाहेर काढा, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad यांनी केले आहे. तशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    Kick Chhagan Bhujbal in the waist and remove him from the cabinet

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या अनेक निर्णयाला विरोध करणार्या मंत्री भुजबळ यांच्याबद्दल समाजात संताप व्यक्त केला जात आहे. यासर्व प्रकाराबद्दल आमदार गायकवाड यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. आमदार गायकवाड म्हणाले, भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळातुन बाहेर काढावे.

    मागील काही महिन्यांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना महाविकास आघाडीचे मंत्री आपल्याच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपल्या सरकारी बंगल्यावर बैठका घेत मराठा समाजावर जोरदार टीका टिपणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला की लगेच त्यावर मंत्री भुजबळ टिपणी का करतात, असे म्हटले आहे.

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना मंत्री भुजबळ यांनी मराठा समाजाला टार्गेट करत सातत्याने आरक्षणाला विरोध दर्शविला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी त्यांनी उघड भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री मराठा समाजासाठी काही निर्णय घेऊ पाहत आहेत. तर त्यांच्या निर्णयालाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी भुजबळ हे जाहीररीत्या विरोध दर्शवित आहेत.

    या प्रकारामुळे संतापलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार गायकवाड यांनी आता भुजबळ यांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणीच थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार गायकवाड शेवटी म्हणाले, मला भुजबळांना सांगायचे की, ज्या ५७ लाख मराठा नोंदी ओबीसीत असल्याच्या सापडलेल्या आहेत. त्यामुळे कुणाचा बापही आता मराठ्यांच्या मुलांना आरक्षणापासुन रोखु शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. गेल्या ७० वर्षापासुन ते वंचित राहीलेले आहेत. म्हणुन भुजबळ सरकारमध्ये राहुन माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करुन जर मराठा समाजाबद्दल Maratha Reservation विरोधात भुमिका घेत असतील तर त्यांना लाथ घालुन बाहेर काढायला हवे.

  • मराठ्यांना सरसकट नव्हे, ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच मिळणार दाखले

    मराठ्यांना सरसकट नव्हे, ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच मिळणार दाखले

    नागपुर : टीम सत्ताकारण

    Maratha Reservation | भारतीय जनता पक्ष जोपर्यंत सत्तेत आहे. तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसीवर अन्याय होणार नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ओबीसींबद्दल असलेले आपले प्रेम बोलुन दाखवले. तसेच मराठ्यांना सरसकट नव्हे तर ज्यांच्या कुणबी (Kunbi) नोंदी सापडतील, त्यांनाच हे दाखले (प्रमाणपत्र) मिळतील, असेही त्यांनी जाहीर केले.

    Not only Marathas, but only those whose records can be found will get certificates

    नागपूर विमानतळाबाहेर पत्रकारांनी श्री. फडणवीस यांना आरक्षणाबद्दल छेडले असता, ते म्हणाले, ओबीसींच्या हक्काचं जतन करावं लागणार आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. तशी वेळ आलीच, तर मी पक्षश्रेष्ठींशी देखील बोलेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहित आहे की, ओबीसी OBC समाजाचे संरक्षण करायचे आहे. त्यामुळे त्यांची भूमिका देखील स्पष्टच आहे. जोपर्यंत भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत काहीही झाले तरी आम्ही ओबीसीचे नुकसान होऊच देणार नाहीत.

    Talk to seniors if needed. but,OBC reservation will not be affected.

    ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे. या आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने मी छगण भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना जे काय आक्षेप असतील, ते त्यांनी सांगावेत. ओबीसींवर अन्याय होत असेल, तर त्यात बदल करू. ज्या सुधारणा करायच्या आहेत, त्या पण करू, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. हे स्पष्ट केले.

  • मुंबईत येणार आणि आरक्षण घेऊनच जाणार !

    मुंबईत येणार आणि आरक्षण घेऊनच जाणार !

    पुणे : टीम सत्ताकारण

    Maratha Reservation | आरक्षण तर घेणारच आणि तेही ओबीसीतूनच, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरुवारी (ता.२५) लोणावळा येथे व्यक्त केला आहे. फक्त एकदा आरक्षण मिळु द्या, मग ते विरोधक कसे एकदम निट करतो, तेही पाहा, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला आहे.

    Will come to Mumbai and take reservation

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनी मराठा आंदोलक निघाले आहेत. रात्री लोणावळा येथे मुक्काम केल्यानंतर उपस्थीत लाखो जनसमुदयाला जरांगे पाटील यांनी संबोधीत केले. ते म्हणाले, आजचा आपला वाशी येथे शेवटचा मुक्काम आहे. यानंतर आपण मुंबईत मुक्काम  थाटणार आहोत.

    मुंबईत गेल्यावर आपण कुठलीही गरबड करायची नाही. इतर कुणी काही उद्रेक करु पाहत असेल तर त्याला पोलिसांकडे द्यायचे आहे. आपण आत्तापर्यंत शांत आलात, दिलेल्या शब्दाला माझा Maratha मराठा समाज जागलाय. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो, हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवले.

    मुंबईत सुद्धा आणि शांततेत जाणार कुठेही गडबड होणार नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो आणि आजही ठाम आहोत. उद्या महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा मुंबईत येणार आहे. मुंबई आमची, Maharashtra महाराष्ट्र सुध्दा आमचा आहे. जनता सुद्धा आमची आहे.

    बांधवांनो, तुम्हाला स्वतःला स्वयंसेवक व्हायचे आहे. कुणी जाळपोळ उद्रेक करतोय का, याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. कुणी काही गरबड करत असेल तर त्याला जाग्यावर धरून ठेवायचं आणि पोलिसांच्या गाडीत टाकायचे आहे. मग तो कोणाचाही असो. आपल्याला मुंबईत येणार्या आपल्या भगीनींचे संरक्षण करायचे आहे.

    तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर तुम्ही त्याला त्रास देऊ नका, तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवा. मग, मी बघतो त्याचं. सरकारकडूनही तुमच्यावर काही दडपण आणण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते मला येऊन सांगा. मला विचारल्याशिवाय काहीच ॲक्शन घेऊ नका. काही विघ्नसंतोषी आजूबाजूला दिसतात का, यावरही लक्ष असु द्या.

    आपल्या माध्यमातून कुणीही राजकारण करता कामा नये. आपण आपल्या लेकराच्या हितासाठी येथे आलोत, हे लक्षात ठेवा. मला शिष्टमंडळाने बेजार केले आहे. शांततेच्या युद्धात मोठी ताकद आहे. एक मुलगा म्हणून तुम्हाला सांगतोय आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवले आहे. मराठ्यांना लढायचा इतिहास आहे.

    रस्त्यात इतर लोकांना मदत करत चला. मराठ्यांच्या वाट्याला कोण जातंय तेही मला बघायचंय, त्यांची वळवळच बंद करतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशीच एकजूट आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे. कितीही संकटे आली तरी आपण ती पार करू, असे सांगत शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

  • शरद पवारांकडुन ‘त्या’ घटनाबाह्य कृतीचे समर्थन

    शरद पवारांकडुन ‘त्या’ घटनाबाह्य कृतीचे समर्थन

    छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

    Maratha Reservation | २३ मार्च १९९४- शरद पवारांची घटनाबाह्य कृती, पदाचा गैरवापर आणि अन्यायाची परिसीमा.. याविषयी माझी कोर्टात याचिका असुन याबद्दलचे सगळे तपशील मांडले जातीलच. पण नामदेव जाधव यांच्या निमित्ताने त्या घटनाबाह्य कृतीचे समर्थन केले जात असल्याचा आरोप मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणार्या बाळासाहेब  सराटे यांनी पवारांवर केला आहे.

    याबाबत श्री. सराटे यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की फार तर “प्रशासनिक अधिकारी, भुजबळ वगैरे लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे ती कृती घडली होती” एवढे तरी शरद पवारांनी समोर येऊन सांगण्याचे औदार्य दाखवायला पाहिजे. ज्या गोष्टीचा परिणाम वर्तमान परिस्थिती मध्ये होतो, ती गोष्ट जुन्या काळात सुरू झाली म्हणून सोडून देता येत नाही. त्या गोष्टीला आव्हान देऊन त्याचा परिणाम थांबविणे न्याय्य ठरते.

    मराठा कुणबी समाजाच्या न्यायाच्या आड ज्या गोष्टी येतात किंवा येतील त्याला आव्हान देऊन न्याय मिळविणे हे एक मराठा कुणबी म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. यात कोणत्याही प्रकारे व्यक्तिद्वेष नाही. कोणाचा अनादर करण्यासाठी नव्हे तर समाजाच्या न्यायासाठी ही लढाई आहे. आम्ही ती लढत राहू,  असेही श्री. सराटे यांनी स्पष्ट केले आहे.

  • कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

    कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

    छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

    Maratha Reservation | कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते, आत्या, आजोबांचे चुलते, आत्या, पणजोबांचे चुलते, आत्या, खापर पणजोबांचे चुलते, आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

     

    जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?

    रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.

    स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवालपद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या

    रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा, त्या नोंदी मिळवा.

     

    आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८ अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अंमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.

     

    भूमि अभिलेख कार्यालयातील फॉर्म न. 33 व 34 वरील नोंदी तपासाव्यात, यातही सर्वत्र कुणबी नोंदी आढळून येतात. रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

    रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालणार आहे.

     

  • सरकार पुन्हा अंतरवालीत; जरांगे पाटलाच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष

    सरकार पुन्हा अंतरवालीत; जरांगे पाटलाच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष

    छत्रपती संभाजीनगर : राजेभाऊ मोगल

    Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषणाने सरकारची झोप उडाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बुधवारी (ता.१) सर्वपक्षीय बैठकीत उपोषण मागे घ्यावे, असा ठराव घेण्यात आला.  मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सरकारने गुरुवारी (ता.२) जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ पाठवले असुन ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे.  त्यांनी आरक्षणाबाबत काही ठोस आश्वासन दिले तरच जरांगे पाटील त्यांना प्रतिसाद देतील, नाही तर या शिष्टमंडळास हात हालवत परतावे लागेल, नेमके काय होतेय? हे काही वेळातच समोर येणार आहे.

    मराठा आरक्षणासाठी मागील काही महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी आर- पारची लढाई सुरू केली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात या उपोषणाच्या ठिकाणी सरकारमधील अनेकांनी भेटी दिल्य. उपोषण मागे घ्यावे, यासाठीही मोठे प्रयत्न केले. मात्र, याच दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत न्यायालयात टिकेल, असे आरक्षण देण्यासाठी आम्हाला एका महिन्याचा अवधी द्या, अशी विनंती केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी ४० दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, या ४० दिवसांत सरकारकडून काहीही हालचाली न झाल्याने जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले.

    या आंदोलनाचा आज नववा दिवस असून या आंदोलनास राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, धैर्यशील सोळंके यांच्याघरांसह समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांची हॉटेल पेटुन देण्यात आली. या जाळपोळीच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने काल बुधवारी तातडीने सह्याद्रीवर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावत बैठक घेतली.

    या बैठकीत जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, सरकारला सहकार्य करावे, असा ठराव घेतला. मात्र, हा ठराव देखील जरांगे पाटील यांनी धुडकावून लावला. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्यावे, तसे प्रमाणपत्र वाटप सुरू करावे, या मागणीवर आपण ठाम असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली असून आता ही कोंडी सोडवायची कशी, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आज गुरुवारी एक शिष्ट मंडळ अंतरवाली सराटी येथे पाठवले आहे.

    या शिष्टमंडळात आयोगाचे माजी न्यायमुर्ती एम. जी. गायकवाड, आनंद निगुर्डे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे,  मंत्री उदय सामंत,  आमदार बच्चू कडू, नारायण कुचे यांचा समावेश समावेश आहे. या शिष्टमंडळास जरांगे पाटील यांचे मन वळविण्यात किती यश येते, की पुन्हा रिकाम्या हाताने परतावे लागते? हे काही वेळातच समोर येणार आहे.

  • आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- जरांगे पाटील संतापले

    आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- जरांगे पाटील संतापले

    छत्रपती संभाजीनगर : याेगेश कदम 

    Maratha Reservation | तुम्ही तीस दिवस मागितले होते, मी ४० दिवस दिले. या ४० दिवसात तुम्ही काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा पवित्रा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतला आहे.

    अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी ४० दिवसानंतर पुन्हा आंदोलनाला सुरुवात केलेली असून आज मंगळवारी आंदोलनाचा आठवा दिवस आहे. सरकारने ४० दिवस मागून घेतल्यानंतर कुठलीही सकारात्मक घोषणा केली नाही. या ४० दिवसाच्या काळात जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे केले. त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या काळात सरकारकडून फारसे प्रयत्न न झाल्याने, शिवाय केवळ ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करू, अशी भूमिका सरकारने घेतल्यामुळे जरांगे पाटील संतापले आहेत.

    पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. मला केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना नव्हे तर राज्यभरातील सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण हवे आहे. हे आंदोलन आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. आंदोलन उधळण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. या आंदोलनादरम्यान पोलीस यंत्रणा सरकारसोबत आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना देखील हे सरकार पोलिसांना सांगून मारहाण करीत आहे. यामागे उपमुख्यमंत्र्याचा डाव आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.

    आंदोलन थांबविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत. आंदोलन बंद करण्याची भूमिका सरकारने घेतली असून ती समाजाला मान्य नाही. सरसकट आरक्षण द्या; अन्यथा आज संध्याकाळपासून आपण जलत्याग करणार आहोत. असे असे सांगत हे आंदोलन आता थांबणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

hacklink Porno siteleri HDRaja567casinojojobetjojobet