जरांगे  पाटील संतापले, कमिशनरसमोरच म्हणाले, शासनाच्या मायचा…

तुम्ही नीच अवलदीचे निघाले...! माझा जीव गेल्यावर सरकार राहील का?

जालना : टीम सत्ताकारण

Maratha Reservation | अंगावर गुलाल घेऊन अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या पदरात काहीच पडले नाही, अशी भुमिका अनेकांनी मांडल्याने पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. तातडीने कायदा करुन ओबीसीमधुनच आरक्षण द्या, यासाठी सुरु केलेल्या उपोषणास सरकार गांभीर्यांने घेत नसल्याने जरांगे पाटील Manoj Jarange Patil चांगलेच संतापले आहेत.

सरकारला तुम्ही नीच अवलादीचे निघाले… ! माझा जीव गेल्यावर सरकार राहील का? शासनाच्या मायीचा चि… अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यापासुन वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करणार्या जरांगे पाटील यांनी राज्यभर मराठा समाज एकत्र करुन मोठे आंदोलन उभे केले होते. प्रत्येकवेळी अल्टीमेटम देऊन आंदोलन पुढे-पुढे नेले.

Jarange Patil got angry, said in front of the commissioner, the government’s…

शेवटचे आंदोलन म्हणत अंतरवाली ते मुंबई असा  मोर्चाही नेला. मुंबईच्या वेशीवर म्हणजे वाशीत तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या, असे सांगत एक अद्यादेश कम ड्राप पाटलाच्या हाती देत तेथेच मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने गुलाल उधळण्यात आला. तेथुन माघारी फिरलेल्या जरांगे पाटलांच्या या भुमिकेवर टिका-टिप्पनी झाली.

पदरात काहीही पडले नसल्याचे चित्र उभे झाल्याने त्यांनी गेल्या पाच दिवसांपासुन पुन्हा उपोषण सुरु केले आहे. मात्र, या उपोषणास सरकारकडुन महत्व मिळत नसल्याने पाटील संतापले आहेत. मंगळवारी (ता.१३) त्यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्यासमोरच शासनाच्या मायीचा…, अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला आहे. सरकारने समाजासोबत दगा केल्याची भावना व्यक्त होत असतानाच आता हे आंदोलन कुठल्या पातळीवर जाईल, हे वेळच सांगेल.

You might also like