“छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रीमंडळातुन काढा”

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : टीम सत्ताकारण

Maratha Reservation  | मराठा आरक्षणाबाबत सातत्याने विरोधात बोलणार्या छगण भुजबळांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मंत्री भुजबळ यांना कमरेत लाथ घालुन मंत्रीमंडळातुन बाहेर काढा, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad यांनी केले आहे. तशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Kick Chhagan Bhujbal in the waist and remove him from the cabinet

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या अनेक निर्णयाला विरोध करणार्या मंत्री भुजबळ यांच्याबद्दल समाजात संताप व्यक्त केला जात आहे. यासर्व प्रकाराबद्दल आमदार गायकवाड यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. आमदार गायकवाड म्हणाले, भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळातुन बाहेर काढावे.

मागील काही महिन्यांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना महाविकास आघाडीचे मंत्री आपल्याच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपल्या सरकारी बंगल्यावर बैठका घेत मराठा समाजावर जोरदार टीका टिपणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला की लगेच त्यावर मंत्री भुजबळ टिपणी का करतात, असे म्हटले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना मंत्री भुजबळ यांनी मराठा समाजाला टार्गेट करत सातत्याने आरक्षणाला विरोध दर्शविला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी त्यांनी उघड भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री मराठा समाजासाठी काही निर्णय घेऊ पाहत आहेत. तर त्यांच्या निर्णयालाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी भुजबळ हे जाहीररीत्या विरोध दर्शवित आहेत.

या प्रकारामुळे संतापलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार गायकवाड यांनी आता भुजबळ यांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणीच थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार गायकवाड शेवटी म्हणाले, मला भुजबळांना सांगायचे की, ज्या ५७ लाख मराठा नोंदी ओबीसीत असल्याच्या सापडलेल्या आहेत. त्यामुळे कुणाचा बापही आता मराठ्यांच्या मुलांना आरक्षणापासुन रोखु शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. गेल्या ७० वर्षापासुन ते वंचित राहीलेले आहेत. म्हणुन भुजबळ सरकारमध्ये राहुन माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करुन जर मराठा समाजाबद्दल Maratha Reservation विरोधात भुमिका घेत असतील तर त्यांना लाथ घालुन बाहेर काढायला हवे.

You might also like