मुंबईत येणार आणि आरक्षण घेऊनच जाणार !

मनोज जरांगे पाटलांचा लोणावळ्यात निर्धार

पुणे : टीम सत्ताकारण

Maratha Reservation | आरक्षण तर घेणारच आणि तेही ओबीसीतूनच, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरुवारी (ता.२५) लोणावळा येथे व्यक्त केला आहे. फक्त एकदा आरक्षण मिळु द्या, मग ते विरोधक कसे एकदम निट करतो, तेही पाहा, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला आहे.

Will come to Mumbai and take reservation

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनी मराठा आंदोलक निघाले आहेत. रात्री लोणावळा येथे मुक्काम केल्यानंतर उपस्थीत लाखो जनसमुदयाला जरांगे पाटील यांनी संबोधीत केले. ते म्हणाले, आजचा आपला वाशी येथे शेवटचा मुक्काम आहे. यानंतर आपण मुंबईत मुक्काम  थाटणार आहोत.

मुंबईत गेल्यावर आपण कुठलीही गरबड करायची नाही. इतर कुणी काही उद्रेक करु पाहत असेल तर त्याला पोलिसांकडे द्यायचे आहे. आपण आत्तापर्यंत शांत आलात, दिलेल्या शब्दाला माझा Maratha मराठा समाज जागलाय. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो, हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवले.

मुंबईत सुद्धा आणि शांततेत जाणार कुठेही गडबड होणार नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो आणि आजही ठाम आहोत. उद्या महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा मुंबईत येणार आहे. मुंबई आमची, Maharashtra महाराष्ट्र सुध्दा आमचा आहे. जनता सुद्धा आमची आहे.

बांधवांनो, तुम्हाला स्वतःला स्वयंसेवक व्हायचे आहे. कुणी जाळपोळ उद्रेक करतोय का, याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. कुणी काही गरबड करत असेल तर त्याला जाग्यावर धरून ठेवायचं आणि पोलिसांच्या गाडीत टाकायचे आहे. मग तो कोणाचाही असो. आपल्याला मुंबईत येणार्या आपल्या भगीनींचे संरक्षण करायचे आहे.

तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर तुम्ही त्याला त्रास देऊ नका, तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवा. मग, मी बघतो त्याचं. सरकारकडूनही तुमच्यावर काही दडपण आणण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते मला येऊन सांगा. मला विचारल्याशिवाय काहीच ॲक्शन घेऊ नका. काही विघ्नसंतोषी आजूबाजूला दिसतात का, यावरही लक्ष असु द्या.

आपल्या माध्यमातून कुणीही राजकारण करता कामा नये. आपण आपल्या लेकराच्या हितासाठी येथे आलोत, हे लक्षात ठेवा. मला शिष्टमंडळाने बेजार केले आहे. शांततेच्या युद्धात मोठी ताकद आहे. एक मुलगा म्हणून तुम्हाला सांगतोय आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवले आहे. मराठ्यांना लढायचा इतिहास आहे.

रस्त्यात इतर लोकांना मदत करत चला. मराठ्यांच्या वाट्याला कोण जातंय तेही मला बघायचंय, त्यांची वळवळच बंद करतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशीच एकजूट आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे. कितीही संकटे आली तरी आपण ती पार करू, असे सांगत शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

You might also like