आग्र्याच्या रणांगणात शिवभक्तांचा हुंकार ; दैदिप्यमान शौर्याचा इतिहास पुन्हा जागवणार

लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सवात डिजिटली २ कोटी शिवभक्त नोंदवणार सहभाग

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

आग्रा किल्ल्याच्या ‘दिवान-ए-आम’ मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. महाराजांचा ३९४ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमांतून २ कोटी शिवभक्त सहभागी होतील. छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा देश आणि जगाला सांगण्याचा आणि दाखवण्याचा उपक्रम येथील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.

The roar of Shiva devotees in the battlefield of Agra; The history of glorious bravery will be reawakened

देशाच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. औरंगजेबासारख्या कपटी आणि कारस्थानी बादशहाने छत्रपतींना कैद करण्याचा डाव याच किल्ल्यात रचला आणि महाराजांना नजर कैदेत ठेवत गनिमी काव्याने औरंगजेबाच्या हातावर तुरी देत सुखरूप महाराष्ट्रात येण्याचा भीमपराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, तो याच ठिकाणी. पावसाळ्यात मराठ्याच्या घोड्यांना बाहेर जागा मिळेना,

म्हणून इथल्याच ताजमहालात महादजी शिंदेंनी मराठ्यांची घोडी बांधली ते ही याच आग्र्यात. हाच दैदिप्यमान इतिहास आपल्याला आग्र्यातून पुन्हा एकदा जागवायचा आहे. पुरातत्व खात्याने या सोहळ्याला परवानगी नाकारली होती, त्या विरोधात अध्यक्ष, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर आपल्या बाजूने निकाल घेतला.

राज्य सरकार सहआयोजक असल्याने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निकाल आपण कोर्टाकडून मिळवला. विनोद पाटील यांनी विनंती केल्यानंतर राज्य सरकार देखील सहआयोजकपद स्वीकारण्यास तयार झाले. आता हा शिवजयंतीचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष अतिथी छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती असेल.

 

असे असेल सोहळ्याचे स्वरूप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथे होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यात संगीत सोहळा, शिवजन्म पाळणा, लेझर शोच्या माध्यमातून आग्र्याच्या सुटकेचा इतिहास, पारंपारिक कला प्रदर्शन, शिवजयंती सोहळा तसेच इतर भव्य कार्यक्रम आग्र्याच्या याच लाल किल्ल्यावर पार पडणार आहेत. आमच्या अधिकृत फेसबुक तसेच राज्यभरातील विविध फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्याची व्यवस्था जगभरातील कोट्यवधी शिवभक्तांसाठी आम्ही केली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगीतले.

 

२ कोटी शिवभक्त डिजिटली शिवजन्मोत्सव सोहळ्यात होतील सहभागी

प्रत्येकाने १९ फेब्रुवारी रोजी डिजिटल माध्यमातून या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि आग्र्यातील महाराष्ट्राचे वैभव पहावे, असे आवाहन अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आयोजक पाटील यांनी केली.

You might also like