शरद पवारांकडुन ‘त्या’ घटनाबाह्य कृतीचे समर्थन

डाॅ. बाळासाहेब सराटे यांचा आरोप : नामदेव जाधव यांच्या निमित्ताने सोशल मीडियावरही चर्चा

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

Maratha Reservation | २३ मार्च १९९४- शरद पवारांची घटनाबाह्य कृती, पदाचा गैरवापर आणि अन्यायाची परिसीमा.. याविषयी माझी कोर्टात याचिका असुन याबद्दलचे सगळे तपशील मांडले जातीलच. पण नामदेव जाधव यांच्या निमित्ताने त्या घटनाबाह्य कृतीचे समर्थन केले जात असल्याचा आरोप मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणार्या बाळासाहेब  सराटे यांनी पवारांवर केला आहे.

याबाबत श्री. सराटे यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की फार तर “प्रशासनिक अधिकारी, भुजबळ वगैरे लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे ती कृती घडली होती” एवढे तरी शरद पवारांनी समोर येऊन सांगण्याचे औदार्य दाखवायला पाहिजे. ज्या गोष्टीचा परिणाम वर्तमान परिस्थिती मध्ये होतो, ती गोष्ट जुन्या काळात सुरू झाली म्हणून सोडून देता येत नाही. त्या गोष्टीला आव्हान देऊन त्याचा परिणाम थांबविणे न्याय्य ठरते.

मराठा कुणबी समाजाच्या न्यायाच्या आड ज्या गोष्टी येतात किंवा येतील त्याला आव्हान देऊन न्याय मिळविणे हे एक मराठा कुणबी म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. यात कोणत्याही प्रकारे व्यक्तिद्वेष नाही. कोणाचा अनादर करण्यासाठी नव्हे तर समाजाच्या न्यायासाठी ही लढाई आहे. आम्ही ती लढत राहू,  असेही श्री. सराटे यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like