Category: Politics

  • “ओबीसीकरण” हाच मराठा आरक्षणाचा संविधानिक मार्ग

    “ओबीसीकरण” हाच मराठा आरक्षणाचा संविधानिक मार्ग

    छ़ञपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

    मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सरकारला सांगत आहोत. सरकारने समाजाला दिलेल्या एस.ई.बी.सी. वर्गातील आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली हे अतिशय दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्याय करणारे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ब्रिगेडला असा निकाल अपेक्षितच होता. समाजाला सरसकट ५० टक्यात ओबीसी आरक्षण लागू न करता वेळोवेळी सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारांनी समाजाला असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. समाज व मराठा संघटनांना झुलवत ठेवले, असा आरोप करीत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता शिवानंद भानुसे यांनी केला आहे.

     

    भानुसे यांनी  म्हटले, की महाराष्ट्र सरकारने आता सुप्रीम कोर्टात उपचारात्मक याचिका (Curative petition) दाखल केली आहे. हा फक्त वेळकाढूपणा आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. एक वर्ष होऊन गेले तरी ती पण याचिका दाखल केलीली नव्हती. यावरून सरकारची मराठा समाजाला आरक्षण न देण्याची मानसिकता दिसून येते. पूर्वीच्या न्या. खत्री आयोग ते बापट आयोग ते राणे समिती ते न्या. गायकवाड आयोगाकडे संभाजी ब्रिगेडने पुराव्यांसह केवळ आणि केवळ ओबीसी आरक्षण हीच मागणी केली आहे.

     

    सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे एस.इ.बी.सी.आरक्षण व कायदा असंवैधानिक ठरविले आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा न्या.गायकवाड आयोगातील त्रुटी न्या. भोसले समिती मार्फ़त दूर करुण मराठा समाजाला सरसकट आहे त्या ५० टक्यात ओबीसी आरक्षण लागू केले पाहिजेत. हाच एकमेव सविंधानिक पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी कुणबी म्हणून किंवा मराठा नावाने  अ. ब. क. प्रमाणेच  प्रवर्ग निर्माण करून ओबीसी अंतर्गत आरक्षण लागू करावे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. यात ओबीसी घटकांवर अन्याय नसून अनेक वर्षे आपले संवैधानिक आरक्षण नाकारलेल्या मोठ्या भावास न्याय मिळवून देण्यासाठी हा सामाजिक प्रयत्न आहे. काही ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाजाला भडकविण्याचे प्रयत्न करीत आहे. गावखेड्यामधील ओबीसी समाजाचा मराठा ओबीसीकरणास विरोध नाही तर केवळ काही ओबीसी नेत्यांचाच याला विरोध आहे.परंतु हे ओबीसीनेते ओबीसी समाजापेक्षा आपआपल्या पक्षाचे समर्थक आहेत हे लक्षात घेतले पाहिजे व ह्याच ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ओबीसी असलेल्या कुणबी समाजाच्या नेत्यांना मात्र बोलाविले जात नाही. यावरुन ओबीसी नेत्यांची चालबाजी व फसवेगिरी लक्षात येते. मराठा आरक्षण हा मुद्दा दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांनी व मराठा आरक्षण विरोधी संघटनांनी सामाजिक कडून राजकीयकडे वळवलेला आहे. त्यामुळेच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू केले जात नाही. तसेच मराठा समाजाचे ओबीसीकरण करावे ही बाजू मांडणारे राजकीय पक्ष वा आमदार नाहीत.

     

    वास्तविक राज्य घटनेनुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या १९९२ च्या इंद्रा सहानी निकालानुसार कोणत्याही राज्याला त्यांच्या अधिकारात सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग घटकांना ओबीसीपात्र ठरविता येते. संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी हीच भूमिका मांडलेली आहे. आजही या भूमिकेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शेवटी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पुन्हा या परिस्थितीत मागणी करीत आहोत की,महाराष्ट्र शासनाने आपल्या संवैधानिक चौकटीत राहून न्या. गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसी अंतर्गत समाविष्ट करून वर सूचविल्याप्रमाणे ओबीसी आरक्षण लागू करावे. तातडीने महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घ्यावा. शेवटी मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे.अन्यथा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा ओबीसीकरणासाठी लढा उभारला आहे.

     

    दर दहा वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना होत असते. देशातील लोकांची सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी जनगणना अत्यंत आवश्यक आहे.परंतु २०२१ मध्ये सरकारने कोरोनाचे कारण सांगून जनगणना केलेली नाही किंवा माहिती उपलब्ध असूनही जनगणनेचे आकडे जाहीर केलेले नाही. त्यामुळे आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात अडथळे येत आहे. जनगणनेमुळे प्रत्येक समुदायाची आकडेवारी समोर येईल. त्यानुसार खरा आणि निश्चित आकडा सर्वांना समजेल आणि त्यानुसार आरक्षण लागू करणे सोपे होईल. मराठा समाजाचा पहिल्यांदा ओबीसीत समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनतर जातनिहाय जनगणना सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकारने जातनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी व त्या जनगणनेचा अहवाल जाहीर करावा. त्यामुळे देशात आरक्षणाच्या मागणीवरून जे वेगवेगळे समूह आंदोलने करीत आहे. त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे सोपे होईल. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून सरकारने विलंब न करता लवकरात लवकर मराठा समाजाचा ओबीसीत सामवेश करुण जातनिहाय जनगणना करावी आणि रोहिणी आयोगानुसार ओबीसीमधे लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार  अ. ब. क. करता येईल. हा मराठा आरक्षणाचा एकमेव संविधानिक मार्ग आहे.

  • आरक्षणाच्या रस्त्यात कुणी निर्माण केले कायदेशीर अडथळे?

    आरक्षणाच्या रस्त्यात कुणी निर्माण केले कायदेशीर अडथळे?

    छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

    प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ समाज घटक म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी आहोत. आरक्षणाच्या रस्त्यात कुणी-कुणी कायदेशीर अडथळे निर्माण केले, हे आता राज्यातील समाजबांधवांना कळाले आहे. जरांगे पाटील, आम्ही आपल्या सोबत आहोत. मात्र, आंदोलनाचा शेवट निराशेत व्हायला नको. अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, शिवप्रहार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केली.

    याबाबत श्री. इंगळे यांनी लिहलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. ते म्हणतात, या आंदोलनाचा शेवट काय होईल? अथवा सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र सरकार देऊ शकेल का? अथवा सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करू शकेल का? ही सामान्य कार्यकर्ता म्हणून शंका आहे. गायकवाड आयोगाच्या शिफारशी सुप्रीम कोर्टात मांडताना जवळपास पाचशे पानाचा इंग्रजी अनुवाद करण्यात उपसमितीचे तत्कालीन अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व सरकार कमी पडले.

    कोरोनाच्या काळात सुप्रीम कोर्टाची ऑनलाइन सुणावनी सुरू असताना तत्कालीन सरकार सपशेल कमी पडले. त्यावर कळस म्हणून मागासवर्गीय आयोग नेमताना लक्ष्मण हाके व बबनराव तायवाडे यांच्यासारखे मराठा द्वेष करणारे ओबीसीनेते सदस्य म्हणून नियुक्त केले. हे सर्व पाप अशोक चव्हाण यांचे आहे. सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचा पेच किचकट केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी काही समन्वयकांच्या तोंडाला आर्थिक रसदचे रक्त लावून बाटवले. म्हणून अशा बाटग्या समन्वयकावर लोकांचा रोष असल्यामुळेच ग्रामीण भागातून तसेच शहराच्या विविध भागातून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

    मात्र, या आंदोलनाचा शेवट निराशात होऊ नये, अशी आशा करूया!. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणाप्रती प्रचंड प्रामाणिक आहेत, असे सद्यस्थितीत दिसून येत आहे. परंतु त्यांना अनेक किचकट कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. हेही तेवढेच खरे. क्युरेटीव्ह पिटीशन परत दाखल करून खेळत ठेवून त्यावर परत लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका काढण्याचा कट भाजपनी रचू नये, अशी अपेक्षा.

    टिकणारे व कायदेशीर आरक्षण याचा मार्ग मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यातूनच जातो हेही तेवढेच खरे. परंतु नऊ पैकी आठ मागासवर्गीय आयोगाचे सदस्य मराठा विरोधक व पूर्वग्रह दूषित असल्यामुळे तेथेही आडकाठी निर्माण झाली आहे, हे वास्तव असल्याचेही श्री. इंगळे यांनी म्हटले आहे.

  • मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांनी आमदारकी सोडली!

    मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांनी आमदारकी सोडली!

    छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

    मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ऐवजी विधानपरिषदेची ॲाफर होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम पसंती होती. पाटील यांनी समाजाच्या प्रश्नासाठी तुर्तास मला काहीही नको, अशी भूमिका घेतली होती. याबाबत त्यांनी कुठे वाच्यताही देखील केली नव्हती. परंतु, याबाबत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीच गौप्यस्फोट केला आहे.

    मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पाटील प्रतिवर्षी त्यांच्या अजिंक्य देवगिरी निवासस्थानी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पाटील यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी आले होते. यावेळी खैरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच बोलताना मोठा गौप्यस्फोट केला.

    शिवसेनेच्या फुटी अगोदर मराठा आरक्षण याचिकाकर्ते पाटील यांना विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ऐवजी विधानपरिषदेची ऑफर होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम पसंती पाटील यांना होती. तेव्हा त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदारकीची विचारणा सुध्दा झाली होती. परंतु पाटील यांनी समाजाच्या प्रश्नासाठी तुर्तास विधानपरिषदेसाठी नकार दिला होता. त्यामुळे सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाली. दानवे यांच्या निवडणुकीची जबाबदारी सुद्धा पाटील यांच्यावरच सोपवली होती. अशीही माहितीही पुढे आली. खैरे यांच्या वक्तव्याने मोठा गौप्यस्फोट समोर आला.

    दरम्यान, याबाबत श्री. पाटील म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला विधान परिषदेची उमेदवारी देऊ केली होती. परंतू मी मराठा समाजाच्या चळवळीसाठी त्यास विनम्र नकार दिला. खरतर आजपर्यंत मी या गोष्टीची कुठेही चर्चा केली नव्हती, मात्र खैरे साहेबांच म्हणणं खर आहे. त्यावेळी शिवसेना पक्षाकडून मला अशी संधी देऊ केली होती. मी नकार दिल्याने श्री. दानवे यांना ही संधी देण्यात आली, ते आमदार झाले, विरोधी पक्षनेते देखील झाले.
    कोणत्याही पक्षाचा झेंडा घेतला तर त्याचे नियम बंधन पाळावे लागतात, त्यांच्या सूचनेप्रमाणे चालावं लागत. त्यावेळी समाजाची न्यायालयीन लढाई मी लढत होतो, त्यामुळे त्यावेळी मला पक्षीय निर्णय घेणे योग्य वाटले नाही म्हणून मी त्यास विनम्रपणे नकार दिला, असे स्पष्ट केला. आगामी काळात श्री. पाटील कोणता निर्णय घेतात, कोणता पक्ष त्यांच्यावर कुठली जबाबदारी टाकतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • राष्ट्रवादीकडूनच अजित पवारांच्या ‘त्या’ जीआरची होळी

    राष्ट्रवादीकडूनच अजित पवारांच्या ‘त्या’ जीआरची होळी

    छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

    युवकांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या कंत्राटी भरतीने भरती या शासन अध्यादेशच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता.१८) क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी  शासनाने काढलेल्या ‘त्या’ जीआरची होळी करण्यात आली. विशेष म्हणजे हा जीआर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढल्याचा आरोप राज्यभर होत आहे.

    याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की रात्रं दिवस अभ्यास करून युवकांचे पुढील नोकरीचे भविष्य खाजगी कंपन्या ठरवणार का? असा सवाल उपस्थित करीत असे असेल तर पंतप्रधानांपासून ग्रामपंचायत सदस्यपर्यंत असलेली पदे कंत्राटी पद्धतीने व खाजगी कंपनीकडून भरण्यात यावेत, अशी खोचक मागणी करण्यात आली. लवकरात लवकर हा जीआर रद्द करावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल. जीआर रद्द झालाच पाहिजे, नोकऱ्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, राज्य सरकार जीआर रद्द करा अन्यथा खुर्ची खाली करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

    या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराचे कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, युवक प्रदेश सचिव आशिष पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, युवती जिल्हाध्यक्ष धनश्री कुदळे, जिल्हाध्यक्ष युवकचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे पाटील, आनंद मगरे, आदित्य रगडे, तारक पठान, सुभान सय्यद, फारुक शेख, आदित्य रगडे, तारक पठाण, शाहरुख मोहम्मद, निलेश परीकर, आतिष खरात, रोहन निकाळजे, निखिल छाजेड, पवन यादव आदी उपस्थित होते.

  • Naresh Maske | “रेड्यांनी शिंगे उगारली की…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे सडेतोड प्रत्युत्तर 

    Naresh Maske | “रेड्यांनी शिंगे उगारली की…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे सडेतोड प्रत्युत्तर 

    Naresh Maske | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत होत्या. ही गुवाहाटीवारी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी आहे. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

    ते म्हणाले, “आवाजही न फुटणाऱ्या बावळट पेंग्विनपेक्षा रेडे परवडले. रेड्यांनी शिंगे उगारली की बिळात जाऊन लपू नका.” त्याचबरोबर लहान मुले खेळण्यातील सुदर्शन चक्र फिरवतात, तसेच त्यांच्या हातात आहे. एक फुंकर मारली की ते उडून जाईल,” असा टोलाही नरेश मस्के यांनी लगावला आहे.

    दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) चांगलेच संतापले आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. संजय गायकवाड म्हणाले, “संजय राऊत यांनी ५० रेडे गुवाहाटीला चालले आणि आमचे सुदर्शन चक्र त्याचा नायनाट करेल, अशी भाषा वापरली. ते आम्हाला रेडेच म्हणत असतील तर कदाचित आम्ही ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्यांच्या तोंडून वेद बोलावले असतील तो हिंदुत्वाचा वेद म्हणणारे रेडे नक्कीच आहोत.

    पुढे ते म्हणाले, “तुम्ही सारखे आम्हाला रेडे म्हणता तुमची औकाद एखाद्या गावात सांडासारखा मोकाट बोकड सोडलेला असतो. ज्याला कोणी कापत सुद्धा नाही. ज्याचा वास येतो, ज्यावा कोणी स्पर्श करत नाही. अशा बोकडांची तुम्ही औलाद आहात.”

    काय म्हणाले होते संजय राऊत?

    “शिवसेनेच्या स्थापनेनंतर १८० सेना निघाल्या. पण दोनच टिकल्या एक भारतीय सेना आणि दुसरी आपली शिवसेना. काही लोक म्हणत आहेत की, २०१९ चा बदला आता घेतला, मात्र शिवसेनेचा बदला घेणाऱ्यांची १०० पितरं खाली यायला पाहिजेत. बदला तर आम्ही घेणार. या मुंबईसाठी पन्नास वर्षे शिवसेनेने रक्ताचे पाणी करून तुम्हाला मोठं केलं मात्र तुम्ही शिवसेना फोडली नाही तर, तुमचे नशीब फोडले आहे. या पुढे आपल्या नशिबात दिवाळी आणि इतरांच्या होळी असेल.”

    महत्वाच्या बातम्या :

  • Kiran Pavaskar | “मुद्दा एकाच, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा”; शिंदे गटातील नेत्याचा आदित्य ठाकरेंना टोला 

    Kiran Pavaskar | “मुद्दा एकाच, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा”; शिंदे गटातील नेत्याचा आदित्य ठाकरेंना टोला 

    Kiran Pavaskar | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे वरळी (Waroli) येथील आमदार आहेत. आमदार पदाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्ताने माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीकारांशी पत्राद्वारे संवाद साधला. वरळीकरांना भावनीक साद घालत त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे गटावर देखील टीका केली.  शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर Kiran Pavaskar) यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केलीय.

    ते म्हणाले, “आदित्य ठाकरे ते तोडगा काढू शकले नाही. पण, त्यांनी पत्र लिहिलं. भावनिक पत्र लिहायची. भावनिक आवाहन करून मतही घ्यायची. कधी आम्हाला त्रास कसा होतो, हे दाखवायचं. कधी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सांगायचं. कधी वडील आजार आहेत, हे दाखवायचं. पण, मुद्दा एकच आहे, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा. प्रश्न कुठलेचं सोडवायचे नाहीत. तो प्रश्न आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडविला.”

    यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. “महाआघाडीचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत हे काम बघतात. कोणी काही वाईट बोललं की, महाराष्ट्राची संस्कृती काय हे समोर येते. सुसंस्कृतपणा दाखविला जातो.”

    दुसऱ्यांना रेडे-म्हशी म्हणा. हा यांचा सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळं ते कितीही बाहेर आले. आतमध्ये गेले. बाहेर आले. पुन्हा आतमध्ये गेले. तरी ते सुधारतील, असं वाटतं नाही, असं म्हणत किरण पावसकर यांनी संजय राऊतांवर टीका केलीय.

    महत्वाच्या बातम्या :

  • Nitin Gadkari | राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,

    Nitin Gadkari | राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,

    Nitin Gadkari | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं.

    हे वाद ताजे असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रकरणावर सूचक पद्धतीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

    ऑफिस ऑफ नितीन गडकरी म्हणजेच गडकरींच्या कार्यालयीन ट्विटर हॅण्डलवरुन एक ३० सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसत आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे,” असं गडकरी यांनी या व्हिडीओमध्ये म्हंटल आहे.

     

    पुढे बोलताना शिवरायांचं गुणगाण गडकरींनी गायलं आहे. “यशवंत! कीर्तिवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा!! निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू ! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !!,” असं गडकरी अगदी हातवारे करुन म्हणतात. तसेच हसून त्यांनी, “डीएड-बीएड करणारा राजा नव्हता, वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता,” असंही महाराजांबद्दल म्हटलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत,” असं कॅप्शन टाकत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

    महत्वाच्या बातम्या :

  • Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा

    Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा

    Sushma Andhare | सिंधुदुर्ग : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) भाजप आणि शिंदे गटावर महाप्रबोधन यात्रेतून हल्लाबोल करत आहेत. काल सुषमा अंधारे यांची औरंगाबाद येथे सभा झाली. त्यांनी नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अंधारे यांची सिंधुदुर्गमध्ये कणकवली येथे सभा होणार आहे. ह्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा दिल्या आहेत.

    आमदार वैभव नाईकांसह अन्य स्थानिक नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन ह्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज कणकवली येथे पोहचेल.

    गेल्या तीन दिवसांपासून महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून औरंगाबादेत सभा घेत असलेल्या सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषदेत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. अंधारे म्हणाले की, महागाईच्या मुद्द्यावर भाजपने २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता, आज त्याच मुख्य प्रश्नापासून मोदी सरकार दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज महागाई गगनाला भीडली आहे. सरकारला त्यावर तोडगा काढता येत नाही. याचे उत्तर द्यायला भाजपकडे वेळ नाही.

    किरीट सोमय्या आणि भाजपचे तथाकथित नेते भ्रष्टाचारावर भरभरून बोलतात. यांनी काही महिन्यांपूर्वी ईडीच्या नोटिसांमुळे प्रताप सर नाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांच्यावर टीका केली होती. या नेत्यांवर आरोपपत्र कधी दाखल होणार, असा माझा प्रश्न आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर संताप व्यक्त केला.

    महत्वाच्या बातम्या : 

  • Chitra Wagh | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

    Chitra Wagh | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

    Chitra Wagh | मुंबई : संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लाव मग बोलेल असं म्हणत वातावरण तापवलेलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील त्यांची पाठराखण केली होती. यालाच आता भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

    यावेळी, माझं भाषण नीट ऐका, एकूण 35 मिनिटांचं भाषण होतं. माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावं. थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटलं. मी सविधानावर विश्वास ठेवणारी आहे. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते आमचे विरोधक करत आहे. ते आमचं काही कौतुक करणार नाही. त्यांनी फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहे. आज टेक्नॉलाजी वाढली आहे. पण त्याचा गैर वापर होत आहे. जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, अशा टोला चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

    दरम्यान, चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती.

    महत्वाच्या बातम्या :

  • सत्तांतर अटळ? शिंदेगट आज मुंबईत दाखल होणार

    सत्तांतर अटळ? शिंदेगट आज मुंबईत दाखल होणार

     

    टीम सत्ताकारण

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांना बहुमत सिद्ध करण्याबाबत पञ दिल्याने सत्तांतर होण्याच्या दिशेनी वारे वाहत असल्याची चिन्हे दिसु लागत असतानाच बुधवारी सकाळी गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेले शिंदेगटातील आमदार मुंबईच्या दिशेनी निघणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

     

    विधानसभा निवडणुका शिवसेना व भारतीय जनता पक्षाने एकञ लढल्या होत्या. जनतेनी या दोघांच्या बाजुने कलही दिला होता. माञ, मुख्यमंञीपदावरुन दोघांमध्ये बिनसल्याने शिवसेनेनी कांग्रेस व राष्टवादी कांग्रेस यांच्यासोबत एकञ येत तिघांनी मिळुन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. वर्षभर सुरळीत कारभार चालल्यानंतर अंतर्गत वाद उफाळुन यायला सुरवात झाली. हळुहळु करीत मागील आठवड्यात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड करीत ३५ हुन अधिक आमदारांना सोबत घेत सुरवातीला सुरत नंतर गुवाहटीला मुक्काम ठोकला. आम्ही सर्वजण सेनेतच असुन उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी मागणी करीत त्यावर ठाम राहीले आहेत.

     

    यावरुन या बंडखोर आमदारांना शिवसेना नेत्यांनी गद्दार असे शब्द वापरत खालच्या दर्जाचीही भाषा वापरली. त्यामुळे वाद मिटण्याऐवजी तो अधिकच वाढला आहे. त्यातच पडद्यामागे असलेले भाजपाच्या नेत्यांनी दिल्ली गाठत शिंदेगटाला सोबत घेत राज्यात नवे सरकार स्थापण करण्याची तयारी सुरु केली. श्री. फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांना पञ देत बहुमत सिद्ध करण्याबाबत मागणी केली. यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होत असुन गुवाहाटी मुक्कामी असलेल्या शिंदेगटाने मुंबईत येण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळण्यात सुरवात झाल्याची चर्चा रंगायला सुरवात झाली आहे.

hacklink Porno siteleri HDRaja567casinojojobetjojobet