Nitin Gadkari | राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,

Nitin Gadkari | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं.

हे वाद ताजे असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रकरणावर सूचक पद्धतीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

ऑफिस ऑफ नितीन गडकरी म्हणजेच गडकरींच्या कार्यालयीन ट्विटर हॅण्डलवरुन एक ३० सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसत आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे,” असं गडकरी यांनी या व्हिडीओमध्ये म्हंटल आहे.

 

पुढे बोलताना शिवरायांचं गुणगाण गडकरींनी गायलं आहे. “यशवंत! कीर्तिवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा!! निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू ! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !!,” असं गडकरी अगदी हातवारे करुन म्हणतात. तसेच हसून त्यांनी, “डीएड-बीएड करणारा राजा नव्हता, वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता,” असंही महाराजांबद्दल म्हटलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत,” असं कॅप्शन टाकत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like