दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक मराठी भाषा वापरा

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात दासू वैद्य यांचा शिक्षक, विद्यार्थ्यासोबत संवाद

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

Chief Minister My School Beautiful School | पैसा किती कमवला यापेक्षा आपण समाधानी आहोत का? ही बाब जास्त महत्त्वाची आहे. जी जागा, जी जमीन आपल्याला जास्त आवडते तेथे सातत्याने खणत रहा. पाणी नक्की लागेल. म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करत रहा, असा सल्ला देत आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर करायला हवा, असे आवाहन ख्यातनाम कवी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी केले.

राज्यात १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या काळात “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”

या अभियानाची सुरवात करण्यात आलेली आहे. या काळात शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासनामार्फत मंगळवारी (ता.२३)  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून कवी डॉ. वैद्य यांची मुलाखत येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे येथील उपसंचालक रमाकांत काठमोरे यांनी आयोजन केलेल्या या संवाद सत्राचे प्रास्ताविक छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी केले. वैशाली जहागीरदार यांनी डॉ. वैद्य यांचा परिचय करून दिला.

डॉ. वैद्य यांची मुलाखत उमेश घेवरीकर यांनी घेतली. या मुलाखत सत्रातून डॉ. वैद्य यांनी अतिशय रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत एससीईआरटी महाराष्ट्र या युट्युब चॅनेल द्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.

तसेच हा कार्यक्रम युट्युबवर पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले.

तसेच उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे, प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, शारदा मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे, सरस्वती भुवन प्रशाला आणि शारदा मंदिर प्रशालेच्या इयत्ता सातवीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद सिनकर यांनी केले.

You might also like