IND vs NZ | सामन्यापूर्वी न्युझीलँडला मोठा धक्का, केन विल्यमसन सोडून ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

टीम महाराष्ट्र देशा: सध्या न्यूझीलंडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या संघांमध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये न्युझीलँडचा पराभव केला आहे. या तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तरी, या मालिकेतील तिसरा सामना 22 तारखेला खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेत न्युझीलँडला मागे सोडले आहे. अशा परिस्थितीत संघ मागे पडल्यावर न्यूझीलंडला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) तिसऱ्या टी 20 मधून बाहेर पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वैद्यकीय कारणांमुळे केन विल्यमसन या मालिकेच्या तिसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. अगोदर घेतलेल्या मेडिकल अपॉइंटमेंटमुळे केन विल्यमसन तिसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये खेळू शकत नाही. हा तिसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता (भारतीय वेळ) नेपियर येथे खेळला जाणार आहे.

दरम्यान, तिसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये केन विल्यमसनच्या जागी न्युझीलँडचा वरिष्ठ गोलंदाज टीम साऊथी न्यूझीलंड संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाचा स्फोटक डावखुरा फलंदाज मार्क चॅपमॅन देखील संघात परतला आहे. तिसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. केन विल्यमसनची अनुपस्थिती न्यूझीलंड संघासाठी एक मोठा धक्का आहे.

न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले आहे की, विल्यमसनला झालेल्या कोपराच्या दुखापतीचा आणि त्याच्या मेडिकल अपॉइंटमेंटचा काही संबंध नाही. केन विल्यमसन वनडे मालिकेपूर्वी संघात परतणार आहे. टी 20 मालिकेनंतर न्युझीलँड आणि भारतीय संघ एकमेकांच्या विरोधात वनडे मालिकाही खेळणार आहे. वनडे मालिकेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन असेल. शिखर धवन सोबत या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचे युवा खेळाडू मैदानावर उतरतील. न्यूझीलंड दौऱ्यावर विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि इतर काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या