रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचे वाचवले प्राण

अमर जगताप या सजग युवा नेत्याचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणाचे सजग युवा नेता अमर संजय जगताप यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करून प्राण वाचवले. ही घटना एपीआय कॉर्नर जवळील सर्व्हिस रोडवर घडली.

युवक काँग्रेसचे फुलंब्री शहराध्यक्ष अमर जगताप यांनी सांगितले, की शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कामानिमित्त गांधीभवन येथे सहकारी अजय गांधींले यांच्यासह जात होतो. एपीआय कॉर्नर येथे त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. तातडीने धाव घेतली असता एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. लोकांना विचारलं असता त्यांना फिट्स येऊन ते डांबरी रस्त्यावर पडले व त्यांना उजव्या भवई व डोक्याला मार लागला असं समजलं. बघ्याची गर्दी झाली पण कोणी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायला कुणी कारवाला, रिक्षावाला तयार नव्हता. आम्ही त्यांना दुचाकीवर घेऊन सुमनांजली हॉस्पिटलला नेले.

तेथे गेल्यानंतर हॉस्पिटल बंद आहे असं सांगितले. त्यानंतर तसंच त्यांनी केतकी हॉस्पिटल येथे घेऊन गेलो. तेथे आपल्याकडे टाके देण्याची सुविधा नाही त्यांना घेऊन जा, असं सांगितले. त्यांनतर त्यांना महालक्ष्मी चौक येथील खरात हॉस्पिटलला घेऊन आलो तेथे त्यांना बघताच त्यांना दुसरीकडे घेऊन जा असं सांगितले. त्यानंतर बुट्टे म्हणून मुकुंदवाडी येथील रिक्षा चालक गृहस्थ भेटले त्यांना विनंती करून आम्ही त्यांना रिक्षामध्ये सह्याद्री हॉस्पिटल रामनगर येथे घेऊन आलो. त्यांना खुप त्रास होत होता ते तडफडत होते, त्यांना बघुन डॉक्टरही घाबरले त्यांनी यांना लवकर घाटी येथे घेऊन जा, असं सांगितले.

१०८ ऍम्ब्युलन्सला कॉल केल्यावर त्यांनी ४०-४५ मिनिट लागतील, असं सांगितले. त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल येथील कर्मचारी संदीप यांनी प्रायव्हेट ऍम्ब्युलन्सला कॉल केला त्यांनी १५ मिनिटचा वेळ सांगितला. तोपर्यंत सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व टीमने त्यांना प्रथमपचार केले. त्यानंतर आम्ही त्यांना प्राव्हेट ऍम्ब्युलन्सनी घाटी येथे आणलं. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दिलेल्या सलाइनमुळे थोडीशी तब्येत सुधारली होती. या सगळ्या मध्ये बराच वेळ गेला. साधारण दीड ते दोन तास निघून गेले.

मग इथून पुढे घाटी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स यांनी औषधोपचार केला. मग त्यांचे खिशे बघितले त्या मध्ये काहीच आयडी प्रूफ, नाव पत्ता काहीच मिळालं नाही, आणि त्याना विचारून काही फायदा झाला नाही ते शुद्धीवरच नव्हते. डोक्यात अजून टेन्शन यांना काही होणार तर नाही ना. मनामध्ये चलबिचल सुरू झाली की आपण त्यांना येथे आणलं ते चांगल केल ना?. मग त्यांना दुपारी साडेतीन वाजता व्यवस्थित शुद्ध आली. त्यांनी त्यांचं नाव गणेश वाघ असून संघर्षनगर येथे राहतो असं सांगितले.

त्यानंतर त्यांच्या घरी कॉल करून सांगितल, की तुम्ही घाटी येथे या तुमचा मुलगा गणेश वाघ यांना चक्कर आली होती. त्यांना आम्ही येथे आणलं. घाबरू नका फक्त चक्कर आली आहे. त्यानंतर त्यांचे आई वडील आले. त्यांना बघून खुप वाईट वाटलं. त्यांचं वय साधारण ६५-७० च्या आसपास होते. मग त्यांना धीर देत त्यांच्या सोबत जाऊन एक्स रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन करून घेतला. त्यानंतर त्यांना मेडिसिन घेऊन दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील जे आनंद पाहून मलाही भरून आले.

त्यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले व नक्की आमच्या घरी ये असा आग्रह धरला. त्यानंतर आम्ही रिक्षाने हसत हसत आमच्या घराकडे यायला निघालो . मनात एक वेगळाच आनंद होता. पण? एक विचार असा ही होता कि प्राव्हेट हॉस्पिटल यांचं कर्तव्य काय? रस्त्यानी जाणाऱ्या कार रिक्षा यांचं कर्तव्य काय? जे डॉक्टर लाखो फीस घेऊन हॉस्पिटल चालवता त्यांचं काय? दुसऱ्या देशापेक्षा आपल्या इथे सरकारी ऍम्ब्युलन्स यायला वेळ का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
अडचणीत असलेल्या व्यक्तीला युवा पिढीने मदत करायला हवी, अशी अपेक्षा अमर यांनी व्यक्त केली.

You might also like