उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठ्यांचा तिरस्कार का?

राज्याच्या राजधाणीत मराठ्यांचे वादळ कुच करत असताना ठाकरेंच्या भाषणात साधा उल्लेखही नाही.

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

maratha reservation | मराठा समाजाच्या जीवावर अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या शिवसेनेला मराठा समाजाबद्दल फार कळवळा नसल्याचेच  दिसुन येत आहे. राज्यात मराठा आंदोलन एका विशिष्ट टप्प्यावर असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आंदोलकांबद्दल कुठल्याही प्रकारची बाजू घेत नसल्याचे दिसत आहे. काल नाशिक येथे खुद्द उद्धव ठाकरे यांची मोठी सभा झाली.

यात त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार प्रहार केले. मात्र, राज्यात चर्चेत असलेल्या सध्याच्या मराठा आंदोलनाबद्दल एक वाक्यही काढले नाही. यावरूनच आता ठाकरे यांची शिवसेना मराठ्यांचा तिरस्कार करत आहे का?

Why Does Uddhav Thackerays Shivsena Hate Marathas? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिवसेना या पक्षाच्या स्थापनेपासून मराठा समाजाने या पक्षाला साथ दिलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे मोठ्या संख्येने, मोठ्या ताकतीने मराठा समाज उभा टाकल्याचा इतिहास आहे. बाळासाहेबांच्या एका सुचनेवरुन प्रसंगी जाळपोळ करण्यासाठी कुठल्याही कारवाईची तमा बाळगली नाही.

बाळासाहेबांच्या पश्चात हा पक्ष त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे सांभाळत होते. दरम्यान, मधल्या काळात शिवसेना पक्षात फुट नव्हे तर पक्षाच्या हक्कावरुन संघर्ष सुरु आहे. असे असताना शिवसेनेचे दोन्ही गट प्रत्येक शिवसैनिक, आपला मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या सोबत राहावे, यासाठी प्रयत्न करीत आहे.

उद्धव ठाकरे यांना सत्तेतून बाहेर पडावे लागल्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना शिंदे गटावर सातत्याने आसूड ओढण्याचे काम चालवले आहे. त्यांच्या या संघर्षाला मराठा समाजाची मोठी सहानुभुती मिळत आलेली आहे. मात्र, आपल्या मागे उभा राहणार्या समाजाबद्दलच सहानुभुती राहिली नाही का, असा प्रश्न उपस्थीत होतो आहे.

आरक्षणासाठी राज्यात मराठा बांधवांनी लक्षवेधी असे ५८ मराठा क्रांती मोर्चे काढले. त्यावेळी सामनाचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत यांनी या मोर्चाला कार्टूनच्या माध्यमातून मुक्का मोर्चा असे संबोधले होते. शिवाय छत्रपती संभाजीनगर येथेही आंदोलनादरम्यान एका मराठा बांधवास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याप्रकारानंतर श्री. राऊत, उद्धव ठाकरे, श्री. दानवे हे मराठा समाजाच्या निशाणावर आलेले आहेत.

मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मराठा समाजाने उभारलेल्या आंदोलनास शिवसेनेनी सातत्याने पाठींबा देऊन, आम्ही तुमच्या सोबतच आहोत, हे दाखवुन देण्याची संधी होती. मात्र, या संधीचा देखील त्यांना फायदा घेता आलेला नाही. यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होत असुन ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेते मराठा समाजाचा तिरस्कार करतात का, अशी भावनाही समाजाची झालेली आहे.

ही चूक आपल्याला महागात पडू नये, म्हणून नंतरच्या काळात ठाकरे कुटुंबाने तसेच राऊत संजय राऊत यांनी समाजाची बाजू घेण्याचे कामही केलेले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील अंतरवाली येथे आंदोलनादरम्यान लाठी चार्ज झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी धाव घेतली होती.

मात्र, आता आंदोलन एका विशिष्ट टप्प्यावर असताना ठाकरे यांची शिवसेना गप्प झाली आहे. असेच चित्र सध्या तरी बघायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या राज्यात केवळ आणि केवळ मराठा आंदोलनाची चर्चा होत असताना काल नाशिक येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी मराठा आरक्षण आणि त्यासाठी उभारण्यात आलेले आंदोलन याबद्दल बोलणे गरजेचे होते.

मराठा आरक्षणासाठी लाखो तरुण, वृध्द महीला पुरुष मोर्चात पायी मुंबईकडे निघालेले असताना मात्र आपल्या भाषणात ठाकरे यांनी साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे हा पक्ष देखील ओबीसीच्या मतापायी राज्यात बहुसंख्येनी असलेल्या मराठा समाजाच्या प्रश्नावर गप्प झालाय का? पुन्हा एकदा मराठा समाजाचा तिरस्कार करत आहे का? असे प्रश्न समाजाच्या वतीने उपस्थित केले जात आहेत.

विरोधी पक्षनेतेही का झालेत शांत?

सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मराठा आंदोलनाबद्दल एवढा शांत का झालाय, हे कळायला तयार नाही. विशेष म्हणजे सध्या राज्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे याच पक्षाचे आहेत. नुकत्याच नागपुर येथे झालेल्या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आता त्यांच्याकडूनही म्हणावी तशी मराठा आंदोलनाची बाजू घेतल्या जात नसल्याचेच दिसुन येत आहे.

You might also like