.. तर देशी दारूचे दुकान जाळून टाकणार – मराठा संघटना आक्रमक

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील बिडकीन येथील देशी दारू दुकानाचा परवाना तत्काळ रद्द करा, या मागणीसाठी मराठा संघटनासह छावा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.२०) पैठण – औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील निलजगाव फाट्यावर निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जर हे देशी दारूचे दुकान बंद केले नाही तर ते जाळून टाकू, असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे.

बिडकीन – निलजगाव रोडवरील गट नं. २५१ येथे देशी दारू दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु सदरील परिसर हा मध्य वस्तीत आहे. तसेच या दुकानापासुन १०० मिटरच्या आत जिल्हा परिषद शाळा, मंदिर, स्मशानभूमी असुन दुकानाच्या शेजारी इतर दुकाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी महिला व मुलींना वावरण्यास त्रास होईल.

परिसरात दारू पिऊन रस्त्यावर भांडण होतील, उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रमाण वाढेल, महिलांची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, परिणामतः परिसरातील शांतता भंग होऊन रोजच नव-नवीन वाद होत राहतील. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या रस्त्यावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढेल. त्यासाठी सदरील दुकान नियोजित ठिकाणी सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक रमेश केरे पाटील, छावाचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे, युवक जिल्हाध्यक्ष किरण काळे, राहुल पाटील, विष्णु मोगल, संतोष कुशेकर, आप्पासाहेब जाधव, पिनू मुरदारे, अण्णासाहेब जाधव, भारत मोघे इम्रान पठाण, सईद कुरेशी, आसिफ कुरेशी, रेवण लोणकर, सचिन जोशी, विलास औटी, कैलास पेहरकर, रवी शिंदे यांच्यासह पदाधिकारी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

hacklink hack forum hacklink film izle hacklinkdeneme bonusu veren sitelergrandpashabetstakejojobetjojobetgrandpashabetmeritking