Share

कडुच्या हो, जातीवाद करु नका रे… मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी?

राजु नवघरे

परभणी : टीम सत्ताकारण

मी, मतदार संघातुन बोलतोय, मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता येईल का? अशी विचारणा करण्यासोबतच ओबीसीमधुन आरक्षण कशाला घेता, असे म्हणणार्या एकाला वसमतचे आमदार राजु नवघरे यांनी चांगलेच फैलावर घेतले.

कडुच्या हो, जातीवाद करु नका रे.. मराठा समाजाचा एवढा तिरस्कार कशासाठी करता, असे विचारत त्याच्यावर आमदार नवघरे चांगलेच खवळले.

मराठा आरक्षणाचा लढा सुरु झाल्यापासुन ओबीसी प्रवर्गातुन समाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजु नवघरे यांना एकाने कॉल करुन मी आपल्या मतदार संघातुन बोलत असल्याचे सांगीतले.

मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता का? ओबीसीमधुन आरक्षण कशाला घेता, असे अनेक प्रश्न विचारले. त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात येताच आमदार नवघरे संतापले. तुला भेटायला येतो, तुला मदत करतो, असे म्हणत त्याला फैलावर घेतले.

तसेच कडुच्या हो, मराठा समाजाचा तिरस्कार करु नका रे, असे खडे बोल असे सुणावले. या संवादाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

परभणी : टीम सत्ताकारण मी, मतदार संघातुन बोलतोय, मला स्पर्धा परीक्षेसाठी मदत करता येईल का? अशी विचारणा करण्यासोबतच ओबीसीमधुन आरक्षण …

पुढे वाचा

Maharashtra Marathwada News Politics Trending

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या